औरंगाबाद : लवकर जाण्यासाठी शहरातील सर्वच मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक राँगसाईड जाण्याला प्राधान्य देतांना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सेव्हन हिल पुलावर राँगसाईडमुळे तरुणीचा अपघातात मृत्यू झाला होता. तरीही यामुळे राँगसाईडने वाहने चालवणार्यांवर कारवाई झालेली पाहायला मिळाली नाही. राँगसाईड गाडी चालवल्यामुळे दररोज अपघात घडत आहे.तरीही वाहनचालक निर्धास्त आहे.
जालना रोड, सेव्हन हिल, क्रांती चौक, बुढ्ढीलेण, सिटी चौक, मोंढा नाका, आकाशवाणी आदी रस्ते हे वर्दळीचे आहे. दररोज असंख्य वाहने रस्त्यावर धावत असतात. यामध्ये राँगसाईने गाडी चालवणार्याची संख्या जास्त दिसते.लवकर जाण्यासाठी लांबून फे रा न मारता. वाहनधारक सर्रासपेण राँगसाईडने गाडी चालवितात. जालना रोडवरील अग्रसेन महाराज चौक ते उच्च न्यायालय सिग्नल, कॅनॉट प्लेस कडून हॉटेल रामा पर्यंत, सेव्हन हिल कडून न्यायालयाच्या दिशेने,आकाशवाणी कडून मोंढ्याकडे जाणार्या रस्त्यावर, क्रांती चौकाकडून बाबा कडे जाणार्या रस्त्यावर, अदालत रोड कडून जय टॉवरकडे जाणार्या अशा विविध रस्त्यांवर बेशिस्त वाहनचालक बिनधास्त राँगसाईड प्रवास करतांना आढळून आले. यातील अनेक रस्त्यांवर अपघात होऊनही वाहनचालकांवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. बीड बायपास रस्त्यावर राँगसाईड वाहने पळविणार्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली दिसते. बाळापूर फाटा ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने राँगसाईड वाहने चालविण्याचे दहा ठिकाण आहेत. राँगसाईडने धावणार्या वाहनांमुळे गतवर्षी एमआयटी कॉलेजजवळ एका मोपेडस्वार विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.
विशेष म्हणजे सिग्नलवर वाहतूक पोलीस असेल तर राँगसाईड वाहतूक बंद असते. यासोबतच जिल्हा बँकेसमोर आणि जिल्हा कोर्टासमोरून अन्वीकर बिल्डिंगच्या दिशेने राँगसाईड वाहने सुसाट असतात. नूतन कॉलनीतून क्रांतीचौकाकडे जाणारा रस्ता, तीन वर्षांपूर्वी बंजारा चौक बंद करण्यात आला. तेव्हापासून अनेक वाहनचालक जालना रोडवरील अमरप्रीत चौकात जाण्यासाठी समाजकल्याण भवनसमोरून राँगसाईडने वाहने नेणे पसंत करतात. मिलकॉनर्नर चौकाकडून तिबेटियन स्वेटर मार्केटसमोरून शेकडो रिक्षाचालक, दुचाकीचालक राँगसाईडने मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातात. तसेच बसस्थानक आणि सिद्धार्थ उद्यानाकडून कार्तिकी हॉटेलकडे वाहनचालक राँगसाईडने जातात.विशेषत: यात तरुणांची संख्या अधिक आहे. वाहतूक पोलिसांनी या सगळ्या ठिकाणी लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.